आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय; भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर म्हटले होते, स्पष्टीकरणानंतर त्यांच्यावर टीका होत आहे

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर टीका करताना हरामखोर म्हटले म्हटले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. यानंतर राऊत यांनी त्यांच्या भाषेत हरामखोर शब्दाचा अर्थ सांगत स्पष्टीकरण दिले होते. या स्पष्टीकरणानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले भातखळकर?

हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर… ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व, राऊत म्हणजे नॉटी बॉय, असे म्हणत अतुल भातखळकरांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्विट
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्विट

अमृता फडणवीसांनी साधला निशाणा

संजय राऊत यांनी हरामखोर शब्दावर दिलेल्या स्पष्टीकरणावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत, असे म्हणत राऊतांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राऊतांचे नाव घेता त्यांना टोला लगावला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser