आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सोनू सूद सवयीने गुन्हेगार, बेकायदेशीर बांधकामातून त्याला पैसे कमवायचेत :  मुंबई महानगरपालिका

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केले; मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले

लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांना घरी पाठवून मसीहा बनलेल्या साेनू सूदवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आराेप आहे.मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या अभिनेत्याचे “सवयीने गुन्हेगार’ असे वर्णन केले आहे. बीएमसीने सांगितले की सोनू सूदने असे पहिल्यांदाच केले नाही तर यापूर्वी जुहू येथील निवासी इमारतीत सतत अनधिकृत बांधकाम केले आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी दाेन वेळा कारवाईही करण्यात आली. उच्च न्यायालयाला बीएमसीने सांगितले की, “साेनूने निवासी इमारतीचे हाॅटेलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. आता ही चूक लपवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. बीएमसीने मागील वर्षी आॅक्टाेबरमध्ये साेनू सूदला नाेटीस बजावली हाेती. त्यानंतर साेनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बीएमसीने साेनू सूदवर टिप्पणी करताना न्यायालयात सांगितले की, अपील करणारी व्यक्ती एक सवयीने गुन्हेगार असून पैशाच्या फायद्यासाठी अनधिकृत बांधकाम केले आहे. आता त्याने पुन्हा बांधकाम सुरू केले आहे, त्यासाठी परवाना विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही.’ बीएमसी पुढे म्हणाली की, सोनूने इमारतीच्या प्लॅनच्या विरोधात जाऊन बेकायदेशीर व्यावसायिक हॉटेल उभारले. आता तो त्याचा बचाव करीत आहे. त्याला यासाठी परवानगी मिळालेली नाही. निवासी इमारतीचा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्याचा परवाना त्याने घेतला नव्हता. साेनू सूदने संपूर्ण इमारतीचे हाॅटेलमध्ये रूपांतर केले आहे. काेणताही परवाना न घेता येथे बेकायदेशीरपणे हॉटेल उभारले जात आहे.

शरद पवारांची घरी जाऊन घेतली भेट, मदतीची आस बुधवारी साेनूने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा संबंध बीएमसीच्या नाेटिसीशी लावला जात आहे. बुधवारी सकाळी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर आेक निवासस्थानी भेट झाल्यानंतर साेनू म्हणाला, लाॅकडाऊनमध्ये मी केलेल्या कामाची माहिती पवार यांना दिली. पवारांच्या मदतीने या अडचणीतून बाहेर पडण्याची साेनूची इच्छा असल्याचे मानले जात आहे.

दु:ख व्यक्त : चांगले का आहे कोर्टाच्या प्रकरणात घेरलेल्या सूद याने बुधवारी अप्रत्यक्षरीत्या सोशल मीडियावर भाष्य केले. त्याने लिहिले- “मुद्दा हा आहे की जर जगात कुणी चांगले असेल तर का चांगले आहे? त्याआधी मंगळवारी साेनूने लिहिले हाेते, “कुणालाही मदत करण्यासाठी मुहूर्त कधी नव्हता आणि कधीच राहणार नाही. आत्ता नाही तर कधीच नाही.’

काय आहे प्रकरण साेनू सूदने महानगरपालिकेच्या काेणत्याही परवानगीशिवाय ६ मजली निवासी इमारत हाॅटेलमध्ये रूपांतरित केल्याचा बीएमसीचा आराेेप आहे. मुंबई महानगरपलिकेने े आॅक्टाेबरमध्ये साेनूला नाेटीस बजावली हाेती, ज्याला त्याने डिसेंबर २०२० मध्ये न्यायालयात आव्हान दिले, परंतु न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. नंतर साेनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या १३ जानेवारीपर्यंत इमारतीवर काेणत्याही प्रकारची कारवाई करण्यास बंदी घातली आहे.

म्हणाली की, सोनूने इमारतीच्या प्लॅनच्या विरोधात जाऊन बेकायदेशीर व्यावसायिक हॉटेल उभारले. आता तो त्याचा बचाव करीत आहे. त्याला यासाठी परवानगी मिळालेली नाही. निवासी इमारतीचा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्याचा परवाना त्याने घेतला नव्हता. साेनू सूदने संपूर्ण इमारतीचे हाॅटेलमध्ये रूपांतर केले आहे. काेणताही परवाना न घेता येथे बेकायदेशीरपणे हॉटेल उभारले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...