आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sonu Sood Mumbai House Raided Updates: Income Tax Department Claims That A Mumbai Based Actor Evaded Tax Amount To More Than Rs. 20 Crore; News And Live Updates

आयकर विभागाचा दावा:सोनू सूदवर 20 कोटींच्या कर चोरीचा आरोप, अभिनेत्याला परदेशातून मिळाला बेकायदेशीर निधी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीदेखील तपास सुरु करण्याच्या तयारीत

कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. कर चोरी प्रकरणी आयकर विभाग गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करत आहे. आयकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान, सोनू सूदने 20 कोटी रुपायांची करचुकवेगिरी केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. यामुळे अभिनेता सोनू सूद यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, या छाप्यानंतर अभिनेता किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतेही विधान जारी करण्यात आलेले नाही.

सोनू सूदने परदेशी देणगीदारांकडून 2.1 कोटींचे ना-नफा निधी गोळा केला असल्याचे तपासातून समोर आले आहे. या व्यवहारांमुळे मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीदेखील चौकशी सुरु करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लखनौमधील एका कंपनीचे 11 लॉकर्स सापडले
आयकर विभागाने त्याच्या चॅरिटी ट्रस्टवर परदेशी योगदान कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आयकर विभागाच्या या दाव्यानंतर अंमलबजावणी संचालनालय याप्रकरणी चौकशी करू शकते. आयकर विभागाने म्हटले की, लखनऊमधील एका इन्फ्रा कंपनीवर छापेमारी केली.

या कंपनीत मुंबईतील अभिनेत्याची भागीदारी असून कंपनीने मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी केली आहे. आयकर विभागाने कंपनीच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली असून यावेळी 1 कोटी 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी एका कंपनीचे 11 लॉकर्स देखील सापडले असल्याचे आयकर विभागाने सांगितले.

छापेमारी दरम्यान अनेक कागदपत्रे सापडली
अभिनेता सोनू सूद आयकर विभागाला त्याच्या उत्पन्नाबाबत जी माहिती देत ​​आहे ती संशयास्पद आहे. आयकर विभागाला सोनू सूदच्या ठिकाणी अनेक कागदपत्रे सापडली आहेत. यावरुन सोनू सूदने मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केले गेले असल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...