आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Soon Passengers Can Travel In Local Train, CM Uddhav Thackeray Said Maharashtra Government Is Planning To Relax The Restrictions Related To Infection; News And Live Updates

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी:लवकरच सुरु होणार लोकल ट्रेन; कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याच्या तयारीत सरकार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिथिलतेमुळे संसर्ग वाढू नये

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा दर कमी असलेल्या जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकार कोरोना निर्बंधात आणखी सूट देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस लवकरच यामधून प्रवास करु शकेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते 'बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट' (बेस्ट) च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली आणि संध्याकाळी 4 नंतरही निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली टप्प्याटप्प्याने आणखी यामध्ये सूट देण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.

शिथिलतेमुळे संसर्ग वाढू नये
ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र सरकार अधिक शिथिलता देण्यास तयार आहे. परंतु, आम्ही प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेत आहोत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांबाबतही निर्णय घेतला जाईल. या शिथिलतेमुळे कोरोना महामारीची इतर लाट येणार नाही हे आपल्याला सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले."

राज्यात 25 जिल्ह्यांत शिथिलता
राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाणे रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...