आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मालिकांचा पाय खोलात:रमजानच्या महिन्यातही नवाब मलिक यांचा मुक्काम कोठडीतच, विशेष न्यायालयाकडून कोठडीत 14 दिवसांची वाढ

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएल कोर्टाने आजही मलिक यांना दिलासा दिला नाही, यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत रहावे लागणार आहे. नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊदच्या गॅंगशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.

नवाब मालिक यांची कोठडी आज संपली होती. यामुळे त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले होते. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यावेळी मालिकांना पलंग वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.

नवाब मलिक यांच्यावर नेमका काय आहे आरोप ?
नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दाऊदच्या टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांच्या घरावर धाड मारली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मालिकांना सुरुवातीला 7 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांना 4 एप्रिल आणि आज 18 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे .

अटक राजकीय सूडबुद्धीतून

नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी हे सगळं राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, असा आरोप भाजपवर नवाब मालिकांच्या कुटुंबियाकडून करण्यात आला आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...