आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसूली प्रकरण:अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीमध्ये वाढ, 6 जुलैपर्यंत कोठडीत राहावे लागणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 जून रोजी दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ केली आहे. आता या दोघांनाही 6 जुलैपर्यंत ईडी कोठडीमध्ये राहावे लागणार आहे. 5 दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने 1 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करत आहे. या तपासा अंतर्गतच 25 जून रोजी दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले होते.

प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहिन्याला 100 कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप त्यात होता. परिणामी देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेल कंपन्या किंवा हवालामार्फत पैसा गुंतवला आहे का, याचा तपास ईडी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...