आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Speedlimit On Pune Mumbai Expressway, To Complete 50 Km In 37 Minutes; If The Rules Are Broken Then You Will Have To Pay A Fine Of 1 Thousand

कोरोना काळात बदल:पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर स्पीड लिमिट, 37 मिनिटांमध्ये पूर्ण करावा लागणार 50 किलोमीटरचा प्रवास, नियम मोडल्यास 1 हजारांचा दंड

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 94 किमी लांबीच्या मार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाची मर्यादा निश्चित केली आहे
  • 1 ऑगस्टपासून या एक्सप्रेस वेवर गती मर्यादेचे पहिल्यांदाच उल्लंघन केल्यावर 1000 रुपये दंड आकारला जाईल

संक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्स्प्रेस वे म्हणजेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम मोडला तर त्याला 1 हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

37 मिनिटांत 50 किमीचा प्रवास होईल पूर्ण
रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील उर्स टोल प्लाझा दरम्यान जवळपास 50 कि.मी. अंतर आहे  आणि कोणत्याही वाहनास निर्धारित गती मर्यादा पार करण्यासाठी 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागायला नको. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला जाईल आणि ई-चालान पाठविला जाईल. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे

पहिला दंड 1 हजार रुपये असेल 
मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्टपासून या एक्सप्रेसवेवर गती मर्यादेचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तसेच वारंवार अशी चूक केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. 94 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर गती मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी ठेवण्यात आली आहे.

नियम मोडल्याची अशी मिळेल माहिती 
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाट विभागाकडे जाणारा रस्ता जवळपास 15 किलोमीटरचा आहे. गती मर्यादा ताशी 50 किलोमीटर निश्चित केली गेली आहे. हायवे पोलिसांच्या तपासणीत असे आढळले आहे की सामान्य गाडी चालवताना 50 किलोमीटर अंतर 37 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले जाऊ शकते. जर एखाद्या वाहनाने कमी वेळेत हे अंतर पार केले आहे तर याचा स्पष्ट अर्थ होतो की, चालकाने ठरवलेल्या कालावधीचे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, चालकांना दंड देणे टाळायचे असेल तर यात्रेदरम्यान नवीन नियमांचे पालन करावे लागेल. नियमांचे पालन केल्याने एक्सप्रेसवेवर होणाऱ्या दुर्घटनांमध्ये कमतरता येईल.