आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरोगसीतून मुल जन्माला यावे म्हणुन नागपूरच्या डॉक्टरला हैद्राबादच्या व्क्तीने शुक्राणु दिले. पण प्रत्यक्षात डॉक्टरने प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलगी या व्यक्तीला दिली. त्यापोटी 7 लाख रुपये घेतल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला. या प्रकरणात डॉक्टर आणि दलालांना नागपूर पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणाची गुप्त तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन डॉक्टर विलास भोयर, राहुल निमजे आणि नरेश राऊतला अटक केली आहे.
पोलिसांच्या एका पथकाने हैदराबाद येथे जाऊन बाळासह एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. 28 जानेवारीला एका महिलेने मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीचे खोटे कागदपत्र तयार करुन घेतले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टरने त्या नवजात मुलीला सात लाख रुपयांत हैदराबादच्या दाम्पत्याला विक्री केली.
अनैतिक संबंधातून झाली गर्भधारणा
अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेल्या महिलेने गर्भपातकरीता संशयित आरोपी डॉ. विलास भोयर यांना संपर्क साधला होता. याच काळात हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मूल होत नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा असल्याची माहिती या डॉक्टरला भोयरला मिळाली. त्यानंतर डॉक्टरने त्या महिलेला बाळ जन्माला घालण्यासाठी राजी करुन घेतले, अर्थात या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.
असे फुटले बिंग
अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ देण्यापुर्वी डॉक्टरने संशय येऊ नये म्हणून दाम्पत्यावर डॉक्टरने उपचार सुरू केले. त्यांचे शुक्राणूही मिळवले होते. डॉक्टरने नवजात बालिकेची सात लाख रुपयात विक्री केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची अतिशय गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात आली. त्यानंतर हे बिंग फुटले.
पोलिसांचे पथक हैदराबाद येथे गेल्यानंतर दाम्पत्याची चौकशी करून त्यांना व नवजात मुलीला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीनंतर डॉ. विलास भोयर याने सरोगसीच्या नावावर त्यांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. ज्याच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर विलास भोयरसह तिघांना अटक केली आहे.
खरेदीदार महिलेच्या नावाची आई म्हणून नोंद
मुळ आईऐवजी नवजात बाळ खरेदी करण्यासाठी तयार असलेल्या दाम्पत्याच्या नावाची नोंद केली जाते. नवजात बाळाची कायदेशिर आई म्हणून बाळ खरेदी करणाऱ्या महिला भासवली जाते. यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांनाही हाताशी धरून जन्मदाखला त्वरीत मिळवून दिला जात असल्याचे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.