आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sport Updates: Indian Cricket Discrimination Of Player By BCCI; News And Live Updates

समानतेचा प्रश्न:​​​​​​​भेदभावाची गुगली - एक देश एक खेळ, मेहनताना मात्र वेगवेगळा; भारतीय क्रिकेटमध्ये लिंगभेद किती काळ?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतत चांगली कामगिरी करूनही कमाईच्या बाबतीत महिला खेळाडू खूपच मागे

टेनिसमध्ये पुरुष खेळाडूंइतक्याच बक्षीस रकमेसाठी ७० च्या दशकात लढाई लढणाऱ्या दिग्गज खेळाडू बिली जीन किंग म्हणाल्या होत्या, केकचा तुकडा भेटल्यावर महिलांनी खुश व्हायला हवे असे सर्वांना वाटते. मला वाटते की महिलांजवळ केक, त्याची आयसिंग व चेरीही हवी. समानतेचा हक्क मिळवण्यासाठीच १९७३ मध्ये ‘बॅटल ऑफ सेक्सेस’ लढतीत किंगने पुरुष खेळाडू बाॅबी रिग्सला हरवले. मोठ्या लढाईनंतर टेनिसच्या चारही ग्रँडस्लॅम विजेते महिला व पुरुष खेळाडूंना बक्षिसाची रक्कम सारखी मिळू लागली. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अद्याप महिला व पुरुष खेळाडूंमध्ये भेदभाव करत आहे.

एक देश, एक खेळ असूनही मेहनताना वेगवेगळा आहे. टीम इंडियाच्या पुरुष संघातील टॉप ग्रेड खेळाडूंना वार्षिक सात कोटी रुपये मिळतात, तर पूर्ण महिला संघाचा करार ५.१ कोटी रुपयांचा आहे. २०१५ नंतर महिला संघ टी २० व ५० षटकांच्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर पुरुष संघ तीन वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला व अखेरचा वर्ल्डकप फायनल २०१४ मध्ये खेळला होता तरीही ही स्थिती आहे. १४,६८० कोटी रुपये मालमत्ता असलेल्या बीसीसीआयने नुकतीच महिला संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केल्यानंतर भेदभावाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. १९ महिला खेळाडूंचा एक वर्षाचा करार ५.१ कोटीत झाला.

टॉप ग्रेड महिला खेळाडूंना वर्षाचे ५० लाख रुपये मिळतील. तर पुरुष संघाच्या सर्वात खालच्या (सी) ग्रेड खेळाडूंनाही एक कोटी रुपये मिळतात. मंडळाच्या सरप्लस रकमेतील २६ टक्के खेळाडूंना वाटले. यात आंतरराष्ट्रीय पुरुष खेळाडूंना १३ टक्के, देशांतर्गत पुरुष खेळाडूंना १०.४, तर महिला आणि कनिष्ठ खेळाडूंना २.६ टक्के मिळाले.

कमी सामन्यांचा युक्तिवाद, मात्र जबाबदारी बीसीसीआयची
महिला आणि पुरुष खेळाडूंमधील मॅच फीमध्ये मोठा फरक आहे. पुरुष खेळाडूला एका कसोटी सामन्यासाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख आणि टी-२० साठी ३ लाख मिळतात. महिला खेळाडूंना वनडे आणि टी-२० साठी १-१ लाखच मिळतात. महिलांना कमी वेतनामागे कमी सामन्यांचा युक्तिवाद केला जातो. मात्र मालिका घेणे बीसीसीआयची जबाबदारी आहे. महिला संघ सात वर्षांनी पुढील महिन्यात टेस्ट खेळेल. वनडे नोव्हेंबर २०१९ नंतर यंदा मार्चमध्ये खेळले.

टी २० वर्ल्डकप फायनलनंतर एक वर्ष आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. २०१५ मध्ये बीसीसीआयने महिला खेळाडूंचा करार सुरू केला तेव्हा टॉप ग्रेडसाठी वार्षिक १५ लाख रुपये भेटायचे. पुरुषांसाठी रक्कम एक कोटी होती. सहा वर्षांत टॉप ग्रेड पुरुष खेळाडूंच्या कराराची रक्कम सातपट वाढली तर महिलांची रक्कम तिप्पट झाली.

बातम्या आणखी आहेत...