आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:खेळाडू विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या आदेशाला ‘क्रीडा’ विभागाकडून ‘खो’; हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला, क्रीड क्षेत्रात नैपुण्या मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण दिले जातात, त्यासंबधीचा प्रस्ताव महाविद्यालय, क्रीडा विभागाकडून येणे अपेक्षित असताना बोर्डाच्या आदेशाला क्रीडा विभागाने अक्षरश खो दिला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्यांना वाढीव गुण दिले जातात, त्यासंबधीचे प्रस्ताव महाविद्यालय आणि क्रीडा विभागाकडून बोर्ड मागवते.

शाळा - कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करण्याची मुदत ३० एप्रिल ही अंतिम होती, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विभागीय मंडळाकडे ८ मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती. त्यासबंधीचे पत्र प्रभारी विभागीय सचिव व्ही. व्ही. जोशी यांनी सर्व क्रीडा अधिकार्‍यांना पा'विले होते.

त्यासंबधी स्मरण पत्र देऊनही सवलतीचे प्रस्ताव मुदतीत सादर करा, असे पत्रात नमुद केले होते. या मुदतीत केवळ परभणी जिल्ह्यातील २३५ प्रस्ताव बोर्डाकडे दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रस्तावात अनेक त्रुटी आहे. तोही स्वीकारणे अशक्य आहे. जालना, बीड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातून क्रीडा गुणांच्या सवलतीचे प्रस्ताव मुदतीत प्राप्त झालेले नाहीत. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. बोर्डाच्या आदेशालाच क्रीडा अधिकार्‍यांनी खो दिला आहे.