आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेडणेकरांच्या अडचणीत वाढ:सोमय्यांची तक्रार SRAने स्वीकारली, वरळीतील 4 सदनिका ताब्यात घेण्याचे पालिकेला आदेश

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसआरए प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पेडणेकर परिवाराने वरळी गोमाता जनता एसआरए येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची सोमय्या यांची तक्रार झोपडपट्टी प्राधिकरणाने (एसआरए) स्वीकारली आहे.

पालिकेला आदेश

झोपडपट्टी प्राधिकरणाने वरळी गोमाता येथील या 4 सदनिकांवर निष्कासित कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे पुढील 4 दिवसांत मुंबई पालिकेकडून हे गाळे ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. एसआरएने पालिकेला दिलेले पत्रच सोमय्यांनी ट्विट केले आहे.

नेमका आक्षेप काय?

पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या पत्रात एसआरएने म्हटले आहे की, गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या इमारत क्र. २ मधील सदनिका / गाळा क्र. ६०१ ही गंगाराम विरय्या बोगा यांना वाटप झाली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वितरणाच्या अटी व शर्तीनुसार वितरणाच्या १० वर्षांपर्यंत ही सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करु शकत नाही. या सदनिकेचा वापर गंगाराम विरय्या बोगा यांनी स्वतः करणे आवश्यक होते.

एसआरएने म्हटले आहे की, असे असतानाही ही सदनिका किशोरीताई पेडणेकर यांना रहावयास दिलेली असल्याचे पेडणेकर यांनी नामनिर्देशन पत्रासोबत मुंबई महानगर पालिकेस दिलेल्या माहितीवरुन दिसून येते. यावरुन गंगाराम विरय्या बोगा यांनी झोपुप्रा नियमांचे व वितरणाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (ई) अन्वये सदनिकांवर निष्कासित कारवाई करावी.

4 दिवसांत कारवाई

किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की, एसआरएच्या आदेशानुसार पुढील चार दिवसांत मुंबई महापालिका या गाळ्यांची चौकशी करून ते ताब्यात घेतील.

बातम्या आणखी आहेत...