आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण खात्याचा मोठा निर्णय:गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका, सर्व रखडलेले प्रकल्प ताब्यात घेणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसआरएमध्ये आशयपत्र घेतले म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक होत नाही.

राज्यातील गृहनिर्माण खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) कडून ताब्यात घेतले जाणार आहेत. याविषयी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. यासोबतच जर बिल्डर कोर्टात गेले तर आम्हीही कोर्टात जाणार असा इशाराच आव्हाडांनी दिला आहे.

आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार आहे. एसआरए स्वत: लोकांना घरे बांधून देणार असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, 'बंद झालेले प्रकल्प एसआरए ताब्यात घेऊन स्वत: विकास करणार आहे. यासोबतच गोरगरीबांना घरेही दिली जातील, याची व्यवस्था केली जाईल. त्याच्यात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसएसपीएल) मार्फत फंडची योजना आखली जाईल. यासोबतच तसेच पुनर्विकसित इमारतींमध्ये गोरगरीबांना घरे देखील दिले जातील' असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...