आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • SSC 10th Exams: SSC Exams Cancelled Students To Get Promoted With Internal Exam Ranks Education Minister। Varsha Gaikwad। Maharashtra SSC Board Exams

कोरोना हीच परीक्षा:दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करणार उत्तीर्ण; निकाल मान्य नसलेल्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर देता येईल परीक्षा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना परिस्थितीमुळे SSC दहावीच्या परीक्षा घेतल्याच जाणार नाही असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मंत्रिमंडळाने परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देणार असल्याचे ठरवले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे गुण मान्य नसतील ते परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा देऊ शकतील असे आदेशात सांगण्यात आले आहे.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की विद्यार्थांच्या आरोग्याला राज्याचे प्राधान्य आहे त्यामुळे मुल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत लेखी मुल्यमापनाला ३० गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा याला २० गुण तर विद्यार्थ्यांचा नववीचा विषय निहाय ५० गुण देण्यात येणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

एसएससी मंडळामार्फत जून 2021 पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोव्हिड परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षा देता येणार आहे. विशेषतः पुन्हा परिक्षेला बसणाऱ्या (रिपीटर) आणि काही ठराविक विषय घेऊन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मुल्यमापनाद्वारे उत्तीर्ण केले जाईल.

राज्यातील इयता १० वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. तर ११ वी परीक्षेसाठी पर्यायी सीईटी घेण्यात येणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांना ती देता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. ही सीईटी १०० गुणांची बहुपर्यायी ही परीक्षा असणार आहे. सीईटी देणाऱ्यांना ११वी प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि नंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापन देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विशेषतः ही सीईटी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. सीईटी साठीची तारीख लवकरच जाहीर करू यामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...