आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी:दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या परीक्षेबद्दल नवीन सूचना

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • यंदा परीक्षांसाठी स्वतंत्र केंद्रही असणार नाहीत

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार असल्याची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावा असा प्रश्न होता. याविषयी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी पालक व विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मे 2021 या कालावधीत घेतली जाणार आहे. यासोबतच यंदा परीक्षांसाठी स्वतंत्र केंद्रही असणार नाहीत. आपापल्या शाळेतच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

परीक्षेची वेळ

 • दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
 • 40 व 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून दिला आहे.
 • परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्र

 • कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत.
 • अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षा

 • दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतू या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.
 • प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत सादर करण्यात यावेत.
 • 12 वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत होतील.
 • कोविड-19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5-6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
 • कला/ वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसांत असायमेंट सादर करावेत.
बातम्या आणखी आहेत...