आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • ST Buses Will Run In Other Districts From Today; The Decision Of The State Government On The Face Of Gauri Ganapati, A Relief To The Common Man

एसटी सेवा:लालपरी आजपासून परजिल्ह्यांतही धावणार; गौरी-गणपतीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवाशांच्या सोयीसाठी ई-पास, इतर परवानगीची गरज नाही
  • प्रवासात शासनाने घालून दिलेल्या कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. २० ऑगस्टपासून एसटीची सेवा सुरू होणार आहे. बसमधून प्रवास करण्यासाठी ई-पास वा अन्य कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेले ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात होती. उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्याने सुरू होतील. त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी मास्क घालण्यासह शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे परब यांनी सांगितले.

बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी

> राज्य शासनाच्या धोरणानुसार बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी असणार आहे. तसेच प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

भीतीमुळे यापूर्वी लोकांचा थंड प्रतिसाद

सरकारने यापूर्वीही एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळे त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने तुलनेने कमी प्रभावित जिल्ह्यांतून सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळे तो निर्णय स्थगित करावा लागला होता.

> २२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे दररोज सुमारे १ हजार ३०० बसेसमधून सरासरी ७ हजार २८७ फेऱ्यातून दीड लाख प्रवाशांना सेवा एसटीकडून पुरवली जात होती.

कोरोना काळात विद्यार्थी, परप्रांतीय मजुरांना सेवा

२३ मार्चपासून कोरोना महामारीमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, राजस्थानातील कोटा येथून विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचवणे, कोल्हापूर-सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे अशा प्रकारे सेवा पुरवली आहे.

> खासगी ट्रॅव्हल्सना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटीच्या निर्णयानंतर खासगी टूर्स, ट्रॅव्हल्सलाही परवानगी मिळते का याकडे लक्ष आहे.

> एसटीमधून प्रवासासाठी कोणत्याही कोरोना किंवा इतर चाचणीची अट नाही. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी अधिक असेल त्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...