आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदावर्तेंचे संतापजनक वक्तव्य:म्हणाले- ''गांधीवादाने देशाची, महाराष्ट्राची फसवणूक केली! सदावर्तेंकडून 'नथुरामजी' असाही उल्लेख

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुणरत्न सदावर्ते यांचा राजकारणात प्रवेश, ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ची केली स्थापना

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर खळबळजनक वक्तव्य केले असून गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असे ते म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा नथुरामजी असा उल्लेख केला आहे. त्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गुणरत्न सदावर्तें म्हणाले की, गांधीवादाने देशाची महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असे गंभीर वक्तव्य करुन सदावर्तेंनी नथुरामजी असा महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख केला आहे.

आहे. सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. याची अधिकृत घोषणा त्यांनी आज केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देखील दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरु होते. या राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभे करतील असे बोलले जात आहे. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. यावेळी बोलत असताना सदावर्ते यांनी 95 टक्के कर्मचारी हे एसटी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका देखील केली आहे. ते म्हणाले की, 'भीतीमुळे एसटी बँकेची निवडणूक घ्यायची हिंमत होत नाही. निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच होईल. काही कष्टकऱ्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. तुरूंगात असलेल्या नवाब मलिकांची मंत्रिपदावरून हकालपट्टी का केली नाही? या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. माझं सांगणे आहे की लवकरात लवकर अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जावे.'

आंदोलकांना भडकवल्याच्या आरोपाखाली जावे लागेल होते तुरुंगात
गुणरत्न सदावर्ते नुकतेच हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहायचे होते. आता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आज त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. मात्र यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना भडकवल्याच्या आरोपाखाली सदावर्तेंना तुरुंगात जावे लागले होते. यानंतर राज्यभरातील विविध प्रकरणांमध्ये सदावर्ते काही दिवस तुरुंगात होते. गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिलला जामिन मिळाला.

बातम्या आणखी आहेत...