आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:एसटी राज्यात उभारणार 30 पेट्रोल-डिझेल पंप, महामंडळाचा इंडियन ऑइलसोबत सामंजस्य करार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळात महामंडळाचा तोटा सुमारे ६ हजार कोटींवर - सूत्र

उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून एसटी महामंडळ राज्यभरात ३० ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल व डिझेल पंप सुरू सुरू करत आहे, अशी माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

परिवहनमंत्री परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ व इंडियन ऑइल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंप आणि ५ ठिकाणी एलएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. ते इंडियन ऑइलकडून बांधण्यात येणार आहेत.

तोटा ६ हजार कोटींवर

लॉकडाऊन काळात महामंडळाचा तोटा सुमारे ६ हजार कोटींवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच इंधन विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्थिर स्रोत निर्माण होईल, असे महामंडळाचे मत आहे. एसटी ६ वर्षांपूर्वी १७०० कोटींच्या तोट्यात होती.

बातम्या आणखी आहेत...