आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी सेवा:उद्या राज्यातील संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाचा निर्णय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या मार्गावर आंदोलन होणार आहे किंवा होत आहे अशा रस्त्यांवर वाहतून न करण्याचे प्रशासनाचे निर्देश

दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच या दरम्यान योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत. हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत.

एसटी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, एसटीच्या स्थानिक प्रशासनानने माहिती घेऊन त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तसेच ज्या मार्गावर, रस्त्यावर आंदोलन होणार आहे किंवा होत आहे अशा ठिकाणी वाहतून करू नये असेही या निर्देशात म्हटले आहे.

उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वेळेत भारत बंद

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात उद्या सकाळी 11 ते 3 पर्यंत भारत बंद पुकारण्यात येणार आहे. भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत. आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा नाही. मंगळवारी भारत बंदची वेळ सकाळी 11 वाजेपासून 3 पर्यंत असेल. याचे कारण म्हणजे, सकाळी 11 वाजेपर्यंत अनेकजण ऑफिसला जातात आणि दुपारी 3 वाजेपासून सुट्टीची वेळ सुरू होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser