आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याची काळजी:वारकऱ्यांसाठी एसटीने आरोग्य शिबिराचे आयोजन करावे : परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भक्तांची लाखोंची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी आपण स्वत: करणार असल्याचे परिवहनमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. शुक्रवारी मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री परब म्हणाले, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही परब यांनी बैठकीत दिले.

ग्रुप आरक्षणाला प्राधान्य : आषाढीसाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे. नागरिकांनी ग्रुप बुकिंग केली तर त्यांना गावच्या ठिकाणापासून ते पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी, असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...