आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीचा मोठा निर्णय:एसटीची दिवाळी सणातील हंगामी तिकीट दरवाढ रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवाढ रद्द केल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांना मोठा दिलासा

दिवाळीच्या सुटीत एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यावेळी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द केल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनिल परब म्हणाले : प्रवाशी देवो भव:

मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

एसटी महामंडळाच्या ट्विटरवरूनही ही माहिती देण्यात आली.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळाने ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...