आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • ST Workers Protest । Attempts By Women Protesters To Set Themselves On Fire In Front Of The Ministry Were Stopped By The Police In Time; ST Staff Women In Police Custody

आंदोलन चिघळले:महिला आंदोलकांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला; एसटी कर्मचारी महिला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आठ दिवस होऊन देखील काहीच तोडगा निघत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज तीन ते चार महिला एसटी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या महिला आंदोलकाना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. मागील आठ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आपल्या मागण्यासाठी राज्यसरकारच्या दरबारी आंदोलक करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तर काही कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर आले आहे.

भाजपचा आंदोलनाला पाठिंबा
भारतीय जनता पक्षाने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर आणि इतर कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडून जाणार नसल्याचे पडळकर म्हणाले.

बसस्थानक परिसरात सत्यनारायण पूजा
आज कोल्हापूर विभागातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सत्यनारायण पूजा मांडून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जागरण गोंधळ, भजन, किर्तन यानंतर आता सत्यनारायण पूजा घालत या कर्मचाऱ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...