आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप सुरूच राहणार:एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या नसून, हा तर इन्स्टिट्यूशनल मर्डर; शरद पवार आणि दिलीप वळसे पाटलांचे हे अपयश- गुणरत्न सदावर्ते

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार घेतली असून, हे आंदोलन असेच सुरू राहणार अशी घोषणा एसटी कामगारांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा लढा न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, चाळीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून हा इन्स्टिट्यूशनल मर्डर असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. खासदार शरद पवार आणि वळसे पाटलांचे हे अपयश असल्याचे देखील सदावर्ते म्हणाले. आझाद मैदानावरील आंदोलन जरी मागे घेतले गेले असले तरीही एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून, हा संप असेच पुढे सुरू राहील. असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले.?
न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आतापर्यंत चाळीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. ही आत्महत्या नसून इन्स्टिट्यूशनल मर्डर केला आहे. अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली आहे.

काय म्हणाले पडळकर-खोत?

हे आंदोलन कामगारांनी उभे केले आहे, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचे आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत.

बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, तो निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे वक्तव्य आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी केले आहे. आंदोलन चालू ठेवले तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय त्यांनीच घ्यावा. असे स्पष्ट मत सदाभाऊ खोत यांनी मांडले आहे.

बातम्या आणखी आहेत...