आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST कर्मचाऱ्यांचे मुंबईत पुन्हा आंदोलन:शरद पवारांचा उलटा फोटो दाखवत सदावर्तेंची घोषणाबाजी, 'एक मराठा लाख मराठा'चा नाराही!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गाजले. यानंतर आता पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईतील सेंट्रल बस डेपोत आंदोलन सुरु झाले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत अनेक एसटी कर्मचारी असून त्यांनी सेंट्रल बस डेपोत घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांचा उलटा फोटो दाखवत घोषणाबाजीही केली.

एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी

गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत मुंबईच्या सेंट्रल बस डेपोत अनेक कर्मचारी जमा झाले व त्यांनी जागीच ठिय्या मांडला. वंदे मातरम, जय भवानी - जय शिवाजी यासह एक मराठा लाख मराठा अशा समर्थनार्थ घोषणा गुणरत्न सदावर्ते व त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी यावेळी दिल्या.

शरद पवारांचा उलटा फोटो!

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी शरद पवारांचा फोटो उलटा घेत विरोधाची भुमिका घेतल्याचे दिसून आले. श्याहन्नव करोड शरद पवारसे वसूल करो अशी घोषणाबाजीही त्यांनी व इतरांनी केल्याचे दिसून आले. हे सर्व आंदोलक डेपो संचालकांना भेटण्यासाठी आत गेले आहेत. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे पत्रक घेत मुख्य संचालकांकडे गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अनेक एसटी कर्मचारी होते.

पोलिसांनी अडवले नंतर अनुमती

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अशी भुमिका निभावणाऱ्या गुणरत्न सदावर्ते व अन्य आंदोलकाेना मुख्य संचालकांकडे जाताना त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी त्यांनी जागीच ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांना काही आंदोलकांसह निवदेन देण्यासाठी आत जाण्यास अनुमती दिली.

बातम्या आणखी आहेत...