आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळपास ७ वर्षांपूर्वी ‘स्टार्टअप इंडिया’ची सुरुवात झाल्यापासून आजवर एकूण ८६,७१३ स्टार्टअपना मान्यता मिळाली आहे. त्यातून सुमारे ९ लाख लोकांना रोजगार मिळाला. तरीही देशाचा बेरोजगारी दर केवळ १% घटला आहे. २०१६ मध्ये तो ८.७% होता. मार्च २०२३ मध्ये ७.८% राहिला. यावरून स्पष्ट होते की, बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यात स्टार्टअप फायदेशीर तर आहे, पण सरकारांना आणखी अनेक पावले उचलावी लागतील. महाराष्ट्रात सर्वाधिक १५,५७१ स्टार्टअप सुरू झाले. त्यातून ३ वर्षांतच १.१८ लाख लोकांना रोजगार मिळाला. तरीही गेल्या ७ वर्षांत महाराष्ट्रात बेरोजगारी दर वाढला आहे. जानेवारी २०१६ मध्ये तो ४.६% होता. मार्च २०२३ पर्यंत ५.५% झाला. तथापि, याचदरम्यान यूपीत बेरोजगारी दर १५% वरून ५.५%, गुजरातेत ३.४% वरून १.८% व कर्नाटकात ६.४% वरून २.३% वर आला. हे चारही सर्वाधिक स्टार्टअप असलेल्या टॉप-५ राज्यांपैकी आहेत.
स्थान : सर्वाधिक ५७% रोजगार महाराष्ट्रात
{स्टार्टअपमध्ये ५७% रोजगार केवळ ५ राज्यांनी दिले. ते आहेत महाराष्ट्र (५१,३५७), दिल्ली (३०,०८३), कर्नाटक (२४,४८७), गुजरात (२३,८३२) व यूपी (२२,९६९).
{देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक स्टार्टअप कर्नाटकात (९,९०४) आहेत. त्यानंतर दिल्ली (९,५८८), यूपी (७,७१९) व गुजरातचा (५,८७७) क्रमांक लागतो.
{भारताचे ४८% स्टार्टअप्स दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, पुणे व अहमदाबादसारख्या महानगरांत आहेत. मात्र, मजेशीर म्हणजे ५२% मान्यताप्राप्त स्टार्टअप्स नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत.
{हरियाणात बेरोजगारी दर सर्वाधिक २६.८% आहे. २०१६ मध्ये तो १४.८% होता. येथे ४,५११ स्टार्टअपमुळे १३,७१३ लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले.
{राजस्थानात बेरोजगारी दर २६.४%. २०१६ मध्ये ६.७% होता. येथे २,७३१ स्टार्टअपने ११,६४० नोकऱ्या दिल्या.
क्षेत्र : आयटीमध्ये आहेत सर्वाधिक स्टार्टअप
{डीपीआयआयटीने ३० डिसेंबर २०२२ पर्यंत ५६ क्षेत्रांमध्ये ८६,७१३ स्टार्टअप्सना मंजुरी दिली आहे. २०१६ मध्ये आकडा ४४५ इतकाच होता.
{सर्वाधिक १०,४१९ स्टार्टअप आयटीत आहेत. आरोग्य (८,०८८) दुसऱ्या, शिक्षण (५,६५०) तिसऱ्या, कृषी (४,२६६) चौथ्या, खाद्य-पेय पदार्थ (४,१८१) पाचव्या स्थानी आहे.
{सर्वाधिक २६,५५८ स्टार्टअप २०२२ मध्येच सुरू झाले. त्यापूर्वी २०२१ व २०२० या दोन वर्षांत ३४,६०१ स्टार्टअपना मान्यता मिळाली होती. यातही २०२१ मध्ये २०,०८० सुरू झाले.
{एआयमध्ये आतापर्यंत १,५४० स्टार्टअप उतरले आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये १,३८५ स्टार्टअप. रोबोटिक्समध्ये ४७२ स्टार्टअप आले.
{प्रवासी अनुभव आणि विमानतळ संचालनाशी संबंधित क्षेत्रात गेल्या ८ वर्षांमध्ये सर्वात कमी प्रत्येकी ९ स्टार्टअपनाच मान्यता मिळाली.
चिंता : कपातीदरम्यान ४०% घटला निधी
{आयएनसी४२ च्या अहवालानुसार, १९ एज्युटेक स्टार्टअप्सनी कर्मचारी कपात केली. केवळ ४ युनिकॉर्ननेच ८५०० जणांना नोकरीवरून काढले.
{देशातील आतापर्यंत ८२ स्टार्टअपनी २३,१९५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. २०२१ ते आतापर्यंत भारतीय स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्येही सुमारे ४०% पर्यंत घट आली आहे.
{बायजूने २५००, ओलाने २३००, ब्लिंकिट १६००, अनअकॅडमी १५०० व वेदांतुने ११०९ कर्मचाऱ्यांना काढले.
{एका अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत १६ स्टार्टअप्सनी आपल्या १०० टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला आहे. असे करणाऱ्यांमध्ये बंगळुरूची वीट्रेड व डीयू एक्स एज्युकेशन अन् चेन्नईची फिपोला कंपनी आहे.
{जानेवारी-मार्च २०२३ च्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप्सनी केवळ ७ मोठे करार केले, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा ३० होता. म्हणजे सुमारे ७७% ची घसरण झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.