आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य अकादमी:हिंदी, गुजराती भाषेसाठी राज्याची पुरस्कार योजना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या ३ वर्षांचे साहित्यविषयक पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी ३० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन अकादमीने केले आहे. अधिक माहिती https://mahasahitya.org वर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. हिंदी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी काम करत आहे. ३० डिसेंबरपूर्वी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...