आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंचा निषेध:संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पत्रकाराला केलेल्या अपमानजनक वक्तव्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांना या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने बुधवारी (२ नोव्हेंबर) नोटीस बजावली असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे.

महिला पत्रकाराशी बुधवारी मंत्रालयात बोलताना, ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचे रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्ये त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे.’

बातम्या आणखी आहेत...