आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विद्यार्थ्यांना दिलासा:पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला होता
  • संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची यादी मिळणार

राज्यातील पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीचा अभ्यासक्रमात सरकारने 25 टक्के कपात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

कोरोनाचे संकट असताना 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू केले - शिक्षण मंत्री

राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट असताना देखील आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 15 जून रोजी सुरु केले. राज्यात प्रत्यक्ष सुरु करणे शक्य नसले, तरी विविध माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा अद्याप सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

याआधी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रमात कपात केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा अभ्यासक्रम कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली आहे.