आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक संदर्भात मोठी बातमी:उद्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने, राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशी असेल नवीन नियमावली?

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्बंध लागू आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्ण कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोना निर्बंधामुळे व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा नवी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगली दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अशी असेल नवीन नियमावली?
राज्य सरकारने नवीन नियमावलीत दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. त्यामुळे आता दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहील. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे.

  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू
  • यासाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा
  • राज्यातील धार्मिक स्थळे बंदच

या जिल्ह्यांत निर्बंध कायम
राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे प्रकरणे वाढत आहे, त्या जिल्ह्यांत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर अशा 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...