आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनावरील औषध :राज्य सरकार बांग्लादेशकडून कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमडेसिवीरचे 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'इंजेक्शन मुंबईतील काही रुग्णांना देण्यात आले, त्याचा चांगला परिणाम जाणवला'

कोरोनाविरोधातील लढाईत राज्य सराकरने मोठे पाऊल टाकले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन राज्य सरकारकडून खरेदी केले जाणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या औषधाचे शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. 

करोनाविरोधातील लढ्यासाठी राज्य सरकारने रेमडेसिवीरचे 10 हजार इंजेक्शन खरेदी करण्याचे ठरवले आहे. 'प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे  होतो,' अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले होते.

रेमडेसीवीर इंजेक्शन मुंबईतील काही रुग्णांना देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम जाणवला. पण, औषध फार महाग आहे. ते त्या संबंधित रुग्णांनी विकत आणले होते. पण ते औषध शासनानेही खरेदी केले पाहिजे. हे औषध अँटी व्हायरल आहे. ते व्हायरसला नष्ट करण्याचे काम करत आहे, अशी माहिती टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

पुढे ते म्हणाले की, हे औषध महागडे आहे. पण हे गरीब लोकांनाही उपलब्ध झाले पाहिजे. या दृष्टीकोनातून 10 हजार इंजेक्शन खरेदी  करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतची माहिती मला सांगितली. याचा परिणाम काही गंभीर रुग्णांवर होऊ शकेल. पण ते कोणाला द्यायचे, कोणला नाही याचाही काही प्रोटोकॉल असतो. त्या तपासून निश्चित त्याचा उपयोग होईल. सध्या हे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आपण बांगलादेश मधून आपण त्याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या दिवसात जाणवले. श्वसनाचा त्रास तसेच आणखी हृदयविकार, श्वसनासंबंधीचे आजार असे काही आजार आहेत. त्यांच्यासाठी हे कोरोना ब्रेक करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते, अशीही माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली.

0