आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॉप स्टार मायकेल जॅक्सनच्या २४ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये झालेल्या शोसाठी मुंबईच्या मे. विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला आकारण्यात आलेला ३ कोटी ३४ लाख रुपयांचा करमणूक कर परत करण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मायकेल जॅक्सनच्या शोसाठी आकारलेला करमणूक कर माफ केला होता. यावरून तेव्हा वाद झाला होता. याविषयी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. युती सरकारच्या या निर्णयाविरुद्ध हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. तेव्हा विझक्राफ्ट एजन्सीने ३ कोटी ३४ लाख रुपयांचा कर हायकोर्टात जमा केला होता.
असा आहे विषय
> काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीने मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमास करमाफी देण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
> या याचिकेवर १३ एप्रिल २०११ रोजी सुनावणी झाली. तेव्हा औरंगाबाद खंडपीठाची सरकारला फटकारून निर्णयाला स्थगिती.
> मंत्रालयाला लागलेल्या २०१२ च्या आगीत खटल्याची कागदपत्रे जळाली. त्यामुळे सुनावणी लांबली. २०१८ मध्ये भाजप-सेना सरकारच्या काळात सुनावणीस प्रारंभ झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.