आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • State Health Minister | Rajesh Tope | There Is No New Variant In The State Except Delta, Do Not Be Indifferent Even If The Corona Slows Down; Appeal By Health Minister Rajesh Tope

तिसरी लाट सौम्य राहील:राज्यात डेल्टा व्यतिरिक्त कोणताही नवा व्हेरिअंट नाही, कोरोनाचा वेग मंदावला तरीही गाफील राहू नका; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या तरी कोरोनाचा वेग काहीसा मंदावला असला तरी, गाफील राहू नका. कारण कोरोनाची तिसरी येणार असून, ती सौम्य स्वरूपाची असेल असे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर आणि शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. पुढे जर अशीच स्थिती राहिली तर, निर्बंधामध्ये आणखी सुट दिली जाऊ शकते. असे टोपेंनी निर्बंधात सूटीची इशारा दिला आहे.

राज्यात डेल्टा व्यतिरिक्त कोणतेही व्हेरिअंट नाही
जर्मनी आणि ऑस्टेलियामध्ये डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मात्र, राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण कमी झाला आहे. राज्यात केवळ कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळले असून, याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा व्हेरिअंट महाराष्ट्रात नाही. असे आरोग्यमंत्री म्हणाले.

पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यास हरकत नाही
इयत्ता पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही. याबाबत आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या मान्यतेनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येतील. आपल्याला जास्तीत जास्त 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यायचे आहे. असे टोपे म्हणाले.

गाफील राहू नका
कोरोना कमी झाला असून, तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांना गाफील राहू नये. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने लादलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क घालावे, जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...