आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड महिनाभरानंतर कोरोनामुक्त, ट्विटरवर दिली माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, कोरोनामुक्त झाल्यानंतर शेअर केली कविता

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर माहिती दिली. आपण एक महिन्याच्या विश्रातीनंतर समोर येणार असल्याचे आव्हाड म्हणाले. कोरोनावर विजय मिळवल्यानंतर आव्हाड यांनी ट्वीटरवर एक कविता देखील ट्वीट केली. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आपल्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया."

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर येणार समोर

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले की, "माझ्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की, डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये, ही माझी एक नम्र विनंती. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल."

रुग्णालयातील डॉक्टर, कर्माचाऱ्यांचे मानेल आभार

"माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती."

यावेळी त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर लोकांचे आभार मानले. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेली कविता 

बातम्या आणखी आहेत...