आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंत्र्यांना कोरोना:राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

लातूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाने थैेमान घातले आहे. राज्यातील नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. उदगीर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय बनसोडे यांना काही दिवसांपासून बरे वाटत नव्हते. ते ताप आणि अंगदुखीने आजारी होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उदगीर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. अशात संजय बनसोडे तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत होते. रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांना धीर देत होते. कोरोना रुग्णांच्या सततच्या संपर्कामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली असावी.

याआधी अनेक नेत्यांना कोरोनाची लागण

याआधी देखील ठाकरे सरकारमधील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली. तर अस्लम शेख, अब्दुल सत्तार यांच्यावर उपचार सुरू आहेत.