आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढून ठिकठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. मुंबईतल्या चांदिवली भागातील मेळाव्यात भाषण करताना मशिदीवरील भोंग्यावर अजान सुरू झाली. यावेळी आदित्य ठाकरे भाषण करत होते. अजान होत असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी अजान संपेपर्यंत भाषण थांबवले. त्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरेंच्या या कृतीची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजान ऐकू येत आहे. अजान सुरु झाल्यानंतर 'मला वाटतं दोन मिनिटं थांबूया यांच्यासाठी…’असे म्हणत आदित्य यांनी आपले भाषण काही काळ थांबवले. त्यांनी भाषण थांबवल्यानंतर अजान संपेपर्यंत सभास्थळी शांतता होती. अजान संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. एकिकडे मशिदीवरील भोंगे हटवावेत या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांचे पुतने आदित्य ठाकरे मात्र अजानचा आदर करताना दिसत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी चांदीवली मतदारसंघात मेळाव्याला संबोधित करताना बंडोखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, एक वेळ होती मी आमदारांना निवडून आणण्यासाठी जात होतो. मात्र त्यांनी पक्ष प्रमुखांसोबत गद्दारी केली. थोडी लाज बाळगा, राजीनामा द्या आणि जनतेसमोर जाऊन निवडून या, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार-खासदार यांना दिले.
डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य मैदानात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी निष्ठा यात्रेची सुरुवात केली आहे.
सध्या आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. यात ते लोकांशी संवाद साधत आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात भेटीगाठी आणि मेळावे घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.