आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांना धमकी:आंदोलन बंद करा, अन्यथा मारून टाकू; राजना धमकी,  बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अजानबाबत तुम्ही जे काही करत आहात ते बंद करा, अन्यथा मारून टाकू,’ असे धमकीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बुधवारी भेट घेऊन राज यांना संरक्षण देण्याची मागणी केली. राज यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.

गेल्या महिन्याभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज उठवला. राज ठाकरे यांना आलेले पत्र हे बाळा नांदगावकर यांना आले आहे.

हिंदी-उर्दू भाषेत पत्र
‘अजानबाबात जे तुम्ही करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच, पण राज ठाकरेंनाही मारून टाकू,’ असे पत्रात लिहिले असल्याचे सांगून पत्र हिंदी भाषेत असून त्यात उर्दू शब्दही आहेत, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...