आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Strict Action Will Be Taken Against Negligent Employees Who Administer Sanitizers To 12 Children Instead Of Polio Doses, Health Minister Testifies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ:12 बालकांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजणाऱ्या निष्काळजी कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यवतमाळ जिल्ह्यात पोलिस लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता

यवतमाळ जिल्ह्यात पोलिस लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामुळे त्या 12 बालकांची प्रकृती बिघडली होती. याप्रकरणी मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजणाऱ्या निष्काळजी आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नेमके काय घडले होते?

यवतमाळ जिल्ह्यात पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या गावात घडला होता. 31 जानेवारीला दुपारी लसीकरण झाले. यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्याने सायंकाळी ही बाब लक्षात आली. तातडीने सर्व 12 बालकांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

बाधित मुलांची प्रकृती स्थिर; मंगळवारपर्यंत डिस्चार्ज शक्य

बालकांना सुरुवातीला मळमळ-उलट्यांचा त्रास सुरू झाला. काहींना हातापायात गोळे आले. त्यांना रात्रीच यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलेे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवले आहे. मंगळवारपर्यंत डिस्चार्ज शक्य आहे.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यासह तिघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई

सॅनिटायझर पाजणाऱ्या त्या तीन कर्मचाऱ्यांवर सोमवारी संध्याकाळी उशिरा निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे, सविता पुसनाके, मसराम या आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...