आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Students Don’t Want To Stress In The First Week After All School Starts; Corona Task Force Advises Schools Not To Rush To Finish Courses

शाळा सुरु होणार:सर्व शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना ताण नको; कोरोना टास्क फोर्सचा शाळांना सल्ला, अभ्यासक्रम संपवण्याची घाई नको

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिले २ आठवडे विद्यार्थ्यांशी गप्पा मारून वर्ग सुरू करा

सुमारे दीड वर्षाच्या काळानंतर प्रत्यक्ष शाळा पुन्हा सुरू होत आहेत. यामुळे अभ्यासक्रम संपवायचा आहे, परीक्षेचे नियोजन करायचे आहे, असे करून विद्यार्थ्यांवर ताण देऊ नये, असा सल्ला शुक्रवारी कोरोना टास्क फोर्सने शाळा प्रशासनाला दिला.

शालेय शिक्षण विभागाने ‘शाळा सुरक्षितपणे सुरू करणेबाबत’ मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. दीड वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा दिनक्रम पूर्णपणे बदलला आहे. त्यांना त्यांच्या आई-वडिलांजवळ राहण्याची सवय लागली आहे. याचबरोबर लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण कमी झाल्याने चिडचिडेपणा आदी समस्या मुलांत सुरू झाल्या आहेत. या सर्वांचा विचार करून शिक्षक व पालकांनी आपले वागणे ठेवावे, अशी सूचना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी यावेळी केली.

शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी यांनीही पुढील काळात सकारात्मक वातावरण कसे राहील याबाबत पालक, शिक्षक, माध्यमांनी विचार करावा, अशी सूचना केली. माजी शिक्षण संचालक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी कोरोनाकाळात शाळा सुरू होत आहेत. आतापर्यंत ज्या भागात शाळा सुरू झाल्या आहेत तेथे कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही. पण येत्या काळात पण असे होईलच असे नाही. जरी कुठे असा प्रकार घडला तरी त्यावर सकारात्मकतेने तोडगा काढून पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल असे सांगितले.

४ ऑक्टोबरला स्वागत उत्सव : आता शाळा उघडणार आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ४ ऑक्टोबरला स्वागत उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

पहिले २ आठवडे विद्यार्थ्यांशी गप्पा मारून वर्ग सुरू करा
डॉ. दलवाई म्हणाले, शाळा सुरू होताच तातडीने परीक्षांचे आयोजन करू नये. तसेच लवकर अभ्यासक्रम संपवण्याच्या मागेही लागू नये. पहिले २ आठवडे विद्यार्थ्यांशी समरसून गप्पा मारून वर्ग सुरू करा. त्यांच्यावरील ताण, त्यांच्या मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी संधी द्या, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...