आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर मिळणार पुन्हा संधी, नापास विद्यार्थ्यांची एक महिन्यात पुरवणी परीक्षा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाइन व अपवादात्मक ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात कुलगुरूंच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवसांत घेण्यासाठी विद्यापीठांनी नियोजन करावे, तसेच जे विद्यार्थी या वर्षी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक होणार आहे.

अहवालानंतर कारवाई
विद्यापीठाने ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करून परीक्षा यशस्वीपणे घेतल्या. एकाही विद्यार्थ्यांला कोविडची बाधा होणार नाही याची काळजी घेतली आहे. ज्या विद्यापीठांमध्ये परीक्षेसंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या त्यावर सत्यशोधन समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.