आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा पुष्पा स्टाईलने शिंदे-भाजप सरकारला इशारा:आमची तोंड कुणाला बंद करता येणार नाही; पुन्हा तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारला इशारा दिला आहे. पुन्हा तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही, असे म्हणताना झुकेगा नहीं असे सांगत पुष्पा स्टाईलने सरकारला इशारा दिला आहे.

सरकारला आमची भीती वाटते

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांबरोबर सलग 40 वर्षे काम केलेला माणूस आहे, आमची तोंड कुणाला बंद करता येणार नाही, मोडणार पण, वाकणार नाही, हा बाणा मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतला आहे, लिहिणाऱ्यांची, बोलणाऱ्यांची सरकारला भीती वाटते, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. .

राज्यपालांनी या आधीही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असेच वादग्रस्त वक्तव्य केले, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजाच्या आदर्शाने चालतो, महाराजांच्या आदर्श चिरंतन आहेत. वीर सावरकर यांच्याबद्दल सध्या जे काही वादळ उठलं आहे, भाजपचे लोक हे राहुल गांधी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता राज्यपालांनी शिवाजी महाराजाच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरावे, महाराष्ट्राच मराठी स्वाभिमान दाखवावा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची निष्ठा दाखवायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार, आम्हाला काय करायचे ते करूच असे सांगताना राज्यपालांना काय झाले हे समजत नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...