आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाष देसाई यांचा हल्लाबोल:देवेंद्र फडणवीजी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याऐवजी नागपूरची चौकशी करा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीजी आधी भाजपची सत्ता असलेल्या नागपुरातील बसचा व्यव्हार, 24 तास पाण्याचे आश्वासन, मालमत्ता कराची हुलकावणी, या सर्वांची चौकशी करा. मुंबई महापालिकेची चौकशी करून खोदा पहाड़, निकला चूहा अशी परिस्थिती निर्माण होईल, हाती काही लागणार नाही, असे म्हणत शिवसेने नेते सुभाष देसाई यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

तसेच शिवतिर्थावर जमलेले ते मावळे आणि उडालेले ते कावळे. भारतीय जनता पक्षाने काकवळ ठेवलीय तोपर्यंत कावळे आहेत. जेव्हा भाजप शित टाकणे बंद करेल तेव्हा कावळे कावकाव करत उडून जातील, असे म्हणत सुभाष देसाई यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

पुढे ते म्हणाले की, भाजपचे लोक खासकरून देवेंद्र फडणवीस. हे आले नागपूरवरून आणि येथे मुंबईत महापालिकेतील शिवसेनेच्या काराभाराची चौकशी करू अशी धमकी देत आहेत. कितीही चौकशी करा काहीही हाती लागणार नाही. उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरेंनी मुंबईत विकास केला आहे. बदलेली सुंदर मुंबई ही त्यांना बघवत नाही. म्हणून चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत.

पुढे देसाई म्हणाले की, फडणवीसांना मी सांगू इच्छितो त्यांनी आधी नागपुरची चौकशी करावी. नागपुरमध्ये आपली बस योजनेत त्यांनी खासगी ठेकेदरांना बस चालवण्यास दिल्या होत्या. सुरुवातील या ठेकेंदारांना जे उत्पन्न येईल. त्यात काम करण्याची मुभा होती. आज त्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचा घाट घातला गेला आहे. याची चौकशी करा. हे 100 कोटी रुपये नागपुरच्या महापालिकेचे, नागरिकांचे कसे दिले जातात, याची चौकशी करणार का देवेंद्र फडणवीस? असा सवाल त्यांनी केला. तसेच बड्या लोकांची मालमत्ताकराची 500 कोटींची थकबाकी आहे. या बड्या लोकांचे लागेबांधे हे भाजपशी आहेत. त्याची वसूली अधिकाऱ्यांना करू दिली जात नाही. याची चौकशी होणार आहे का?

नागपुरातील कारभाराला लक्ष्य करत देसाई म्हणाले की, नागपुरकरांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत भाजपशी संबंधित एका ओसीडब्लयू कंपनीला ठेका दिला होता. पण, काही ठिकाणे वगळता नागरिकांना पाणी मिळालेले नाही. आता ही ओसीडब्लयू कंपनी महापालिकेकडे 80 कोटी रुपये मागते आहे. त्यासाठी काम अडवून ठेवले आहे. महापालिकेने कंपनीला 70 कोटी पैसे द्यावे म्हणून भाजपचे नेते दबाव आणत आहेत, असा दावा देसाई यांनी केला.

हातातोडांशी आलेला घास गुजरातला

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव भाजपाकडून केला जात आहे. हा भाजपचा मनसुबा महाराष्ट्र आणि मुंबईसाठी धोकादायक आहे. आर्थिक ताकद ही मुंबईत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडून खिळखिळे करण्याचा प्रयत्न आहे. हातातोडांशी आलेला घास गुजरातला गेला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई पालिकेवर फडकवायलाच हवा. तरच ही मुंबई महाराष्ट्रात ठेवता येईल. मुंबई महाराष्ट्रात हवी असे वाटणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने उद्धव ठाकरेंसोबत राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...