आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझा मुलगा शिंदे गटात गेला हे माझ्यासाठी क्लेशदायी':सुभाष देसाई म्हणाले - मी उद्धव ठाकरेंसोबतच; माझी 'मातोश्री'वरच अढळ निष्ठा

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. शिवसेना, बाळासाहेब, उद्धव ठाकरे व 'मातोश्री' शी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून माझी निष्ठा आहे. आताही आणि पुढेही माझी निष्ठा तशीच अढळ राहील. ठाकरेंना गतवैभव मिळवून देण्याचाच माझा प्रयत्न असल्याचेही ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

मुलाचे राजकारणात काम नाही

सुभाष देसाई म्हणाले, माझ्या मुलाचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

सुभाष देसाईंचे सुपुत्र शिवसेनेत:ठाकरे गटाला धक्का, भूषण देसाई म्हणाले - वडिलांना आधीच स्पष्ट कल्पना दिली होती

ठाकरे गटाचे खंदे नेते सुभाष देसाई यांचे सुपूत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सुभाष देसाईंची आता भूमिका काय हेही विचारले जात आहे. मी माझ्या पक्षप्रवेशाचे वडीलांना (सुभाष देसाईंना) आधीच स्पष्ट कल्पना दिली होती हेही भूषण देसाई यांनी आज स्पष्ट केले. (वाचा सविस्तर)

माझी मातोश्रीशी पाच दशकांपासून निष्ठा

सुभाष देसाई म्हणाले, शिवसेना, बाळासाहेब, उद्धव ठाकरे व 'मातोश्री' शी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून माझी निष्ठा आहे. आताही आणि पुढेही माझी निष्ठा तशीच अढळ राहील.

ठाकरेंना गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्न

सुभाष देसाई म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.

काय म्हणाले भूषण देसाई?

भूषण देसाई म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना बघून त्यांचे काम बघून मी प्रेरित झालो आहे. चौकशीचा ससेमिरा असल्यामुळे शिंदे गटात मी आलो हे चुकीचे आहे. माझा विचार माझा स्वतंत्र आहे. कित्येक वर्षे मी जवळून एकनाथ शिंदे यांना बघत आलो आहे. वडीलांशी माझे स्पष्ट बोलणे खूप आधीच झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...