आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाष देसाईंचे सुपुत्र एकनाथ शिंदेंच्या पक्षात:ठाकरे गटाला धक्का, भूषण देसाई म्हणाले - वडिलांना आधीच स्पष्ट कल्पना दिली होती

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे खंदे नेते सुभाष देसाई यांचे सुपूत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सुभाष देसाईंची आता भूमिका काय हेही विचारले जात आहे. मी माझ्या पक्षप्रवेशाचे वडीलांना (सुभाष देसाईंना) आधीच स्पष्ट कल्पना दिली होती हेही भूषण देसाई यांनी आज स्पष्ट केले.ट

त्यांचा पक्षप्रवेश आज मुंबईत एका सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमच्या पक्षात स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भूषण देसाईंचे मी आमच्या पक्षात स्वागत करतो. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम शिवसैनिक म्हणून आम्ही करीत आहोत. राज्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आमच्या पक्षात दाखल होत आहेत.

'माझा मुलगा शिंदे गटात गेला हे माझ्यासाठी क्लेशदायी':सुभाष देसाई म्हणाले -माझी 'मातोश्री'वरच अढळ निष्ठा, उद्धव ठाकरेंसोबतच​​​​​​​​​​​​​​

''माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. शिवसेना, बाळासाहेब, उद्धव ठाकरे व 'मातोश्री' शी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून माझी निष्ठा आहे. आताही आणि पुढेही माझी निष्ठा तशीच अढळ राहील. ठाकरेंना गतवैभव मिळवून देण्याचाच माझा प्रयत्न असल्याचेही ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. (येथे वाचा सविस्तर)

सर्वचजण आमच्यासोबत

सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही घेतलेली भूमिकेला समर्थन मिळत आहे. पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकरही आमच्यासोबत आले. रामदास कदम असो की, प्रतापराव जाधव सर्वच जण आमच्यासोबत आले. ते सर्व बाळासाहेबांचेच कार्यकर्ते होते.

त्यांना न्याय देण्याचे काम करू

सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही राज्यात विकासाचे काम करीत आहोत. शिवसेनेने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. भूषण देसाई यांचे मी शिवसेनेत अभिनंदन करतो. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला न्याय देण्याचे काम मी करेल. त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो.

ठाकरे - शिंदे गटात फरक - भूषण देसाई

भूषण देसाई म्हणाले, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. शिवसेना व बाळासाहेब ठाकरे या शब्दांना सोडून माझ्यासमोर दुसरे काही आहे हे मला आठवत नाही. हिंदुत्वाचे स्वप्न बाळासाहेबांचे होते. तेच विचार शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पक्षात आलो. त्यांच्या कामामुळे सामान्य जनतेला न्याय मिळत आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे गटात फरक होता म्हणूनच मी शिंदे गटात प्रवेश घेतला.

वडीलांशी माझे स्पष्ट बोलणे झाले

भूषण देसाई म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना बघून त्यांचे काम बघून मी प्रेरित झालो आहे. चौकशीचा ससेमिरा असल्यामुळे शिंदे गटात मी आलो हे चुकीचे आहे. माझा विचार माझा स्वतंत्र आहे. कित्येक वर्षे मी जवळून एकनाथ शिंदे यांना बघत आलो आहे. वडीलांशी माझे स्पष्ट बोलणे खूप आधीच झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...