आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्यावर अन्याय झाला असून आम्ही न्याय मागण्यासाठी आलो, आमची बाजू मांडली आहे. मुख्य शिवसेना पक्ष बळकावण्याचा दुष्ट प्रयत्न होतोय. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी सुभाष देसाई यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलेत होते. राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून सर्वोच्च न्यायालयाकडून आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम असून, आता येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.
शिंदे सरकारवर निशाणा साधताना देसाई म्हणाले की, बेकायदेशीरित्या स्थापन झालेले सरकार रद्द झाले पाहिजे. त्याला स्थगिती मिळाली पाहिजे. अशा आमच्या याचिका आहेत. एकूण सहा याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयाने बारीक लक्ष घातले आहे. घटनात्मक मुद्दे असल्याने याला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
इतिहासाची पुनरावृत्ती होईल
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू होण्यापूर्वी सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले शिवसेनेला गद्दारी नवी नाही. ज्या वेळी गद्दार बाहेर पडले तेव्हा पुन्हा एकदा शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. शिवसैनिकांनी अनेक मोठ्या माणसांना पराभूत केले आहे. यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाताखाली सुनावणी झाली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाने तूर्तास दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालायातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण राहणार आहे.
ठाकरेंची ही होती याचिका
शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.