आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री असताना सुभाष देसाई 10 टक्के कमिशन घ्यायचे:मंत्री संदीपान भुमरे यांचा आरोप, म्हणाले - पन्नास खोके आम्हाला काय सांगता!

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्नास खोके आम्हाला काय सांगता. सुभाष देसाई हे औरंगाबादचे पालकमंत्री असताना 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय काम देत नव्हते, असा आरोप मंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. ते फुलंब्री येथे बोलत होते.

शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीही यापू्र्वी सुभाष देसाईंवर कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. मात्र, आता संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाचा हा आरोप केलाय. त्यामुळे पन्नास खोके-एकदम ओकेला हे उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

काय म्हणाले भुमरे?

मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, औरंगाबादचे पालकमंत्री असताना सुभाष देसाई 10 टक्के कमिशन घ्यायचे. हे कमिशन घेतल्याशिवाय ते कार्यकर्त्यांना काम देत नव्हते. आता हे काय आम्हाला पन्नास खोके म्हणतात, असा आरोप त्यांनी केला. देसाई कमिशन घ्यायचे. अशावेळी कार्यकर्त्यांनी काय करावे. फक्त झेंडेच लावायचे का, असा सवाल भुमरे यांनी केला.

अनेक जण साक्षीदार

मंत्री भुमरे म्हणाले की, सुभाष देसाई हे कमिशन घेतल्याशिवाय रस्त्याला पैसे द्यायचे नाहीत. कंत्राटदारला पैसे दायचे नाहीत. त्यांनी मी खोटे बोलतोय हे सांगावे. त्यांच्या या कृत्याचे अनेक कार्यकर्ते साक्षीदार आहेत, असा दावाही भुमरे यांनी केला आहे.

हेच खरे आहे

मंत्री भुमरे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आम्ही शिवसेना वाढवली. मात्र, मुंबईत बसणारा उद्योगमंत्री, मातोश्रीवर वावरणारा माणूसच आपल्याच कार्यकर्त्यांनाकडून पैसे मागायचा. आम्ही गद्दार नाही. आम्ही उठाव केलाय. आता काहीही म्हणा, हेच खरे आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...