आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयार सापडले:जेजे हॉस्पिटलमध्ये सापडले भुयार ब्रिटिश काळातील भुयार!  भुयार सुमारे 130 वर्षे जुने असल्याचा अंदाज

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये ब्रिटिश काळातील भुयार सापडले आहे. हे भुयार सुमारे १३० वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. भुयार मिळाल्यानंतर रुग्णालयाकडून पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली असून विभाग तपासणी करून आता त्याचा अहवाल स्थानिक प्रशासनाला देईल. जेजे हॉस्पिटलचे डॉ. अरुण राठोड हॉस्पिटलच्या आवारात फिरत असताना त्यांना भिंतीवर एक छिद्र दिसले. त्यानंतर ते भुयार असल्याचे समाेर आले. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, हे भुयार डिलिव्हरी वॉर्डपासून मुलांच्या वॉर्डपर्यंत गेलेले आहे. हे भुयार रुग्णालयाच्या दोन इमारतींना एकमेकांशी जोडते. त्याची लांबी सुमारे २०० मीटर आहे. रुग्णालयाच्या इमारती १७७ वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...