आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेची निवडणूक:अशी होते विधान परिषदेची निवडणूक, आमदारांच्या मतांचे "मूल्य' असे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून परिषदेचे १० सदस्य निवडून द्यायचे आहेत. हे मतदान गुप्त होते. पक्ष व्हीप काढतात, मात्र ते पक्षाच्या एजंटांना दाखवायचे नसते. या निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेनेचे २, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचे २ असे एकूण ११ सदस्य रिंगणात आहेत. विधान परिषदेचे मतदान, मतमोजणी यावर विधिमंडळाचे प्रधान सचिव (निवृत्त) अनंत कळसेंनी सांगितलेली पद्धती.

१. विधान परिषद निवडणुकीत १० उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रत्येकी २७ मते हवीत. प्रत्येक मताचे मूल्य १०० असते. म्हणजे २८०० मते मिळणारा उमेदवार विजयी हाेतो. मात्र, मतदार कमी झाले तर कोटा कमी होऊ शकतो. २. मते देताना १, २, ३, ४ असे पसंतीक्रम द्यावे लागतात. मात्र १ नंतर २ पसंती क्रमांक दिला नाही तर त्याने दिलेले पुढचे पसंती क्रमांक बाद होतात. ३. मतदार कळावा यासाठी मतपत्रिकेवर मतदाराने काही चिन्ह, खूण केल्यास किंवा अनेक मतदारांनी कोपऱ्यात, उजव्या-डाव्या बाजूस पसंती क्रमांक दिल्यास आणि हा पॅटर्न असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवल्यास त्या मतपत्रिका बाद केल्या जाऊ शकतात. ४. मतदान करताना पसंती क्रमांक म्हणून रोमन, मराठी, इंग्रजी अंक टाकले तर चालतात. मात्र देवनागरी किंवा इतर भाषेत अक्षरी पसंती क्रमांक दिले तर मत बाद होते. ५. शेवटच्या फेरीत दोन्ही उमेदवारास समान मते पडल्यास, ज्या उमेदवारास पहिल्या पसंतीची मते अधिक आहेत त्याला विजयी घोषित केले जाते. ६. आजारी मतदाराला मतदान करण्यास साहाय्य हवे असल्यास मतदार नसणारा कोणीही मदत करू शकतो किंवा निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा मतदान करू शकतो. ७. निश्चित केलेला कोटा शेवटच्या उमेदवाराने पूर्ण केला पाहिजे असे नाही. एक-दोन मते कमी असणारा उमेदवार विजयी होऊ शकतो. ८. विधानसभा २८८ अधिक एक अँग्लो इंडियन सदस्य अशी २८९ सदस्यांची संख्या आहे. मात्र, सध्या नामनियुक्त सदस्य निवडण्याची पद्धत बंद आहे. त्यामुळे विधानसभा २८८ सदस्यांची आहे. ९. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. त्यात २७ चा कोटा पूर्ण करणारे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले जातात. १०. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ज्या सदस्याला कोट्याच्या वर सर्वाधिक मते मिळाली आहेत त्याच्या मतपत्रिकेत ज्यांना दुसरा पसंती क्रमांक दिला आहे त्यांना ट्रान्स्फर केली जातात. त्यानंतर कोट्याच्या वर अधिक मते असणाऱ्या पुढच्या उमेदवाराला मते ट्रान्स्फर करण्यास घेतली जातात. ११. एखाद्यास २८ मते मिळाली आहेत. विजयासाठी २५.५१ कोटा आहे. २८०० वजा २५५१ = २०९ मतमूल्य होते. २०९ भागिले २८ = ७.४६ मते अतिरिक्त झाली. २८ गुणिले १० = १९६ मते होतात. ती पुढच्या उमेदवारास वळवण्यात येतात.

..तर महाडिक पराभूत होते? : भाजपकडे राज्यसभा निवडणुकीत सर्वाधिक १०६ मते होती. त्यामुळे त्यांना ४८ हा अधिकचा कोटा त्यांच्या दोन उमेदवारांना निर्धारित करणे शक्य झाले. अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांची प्रत्येकी ७ म्हणजे १४ मते धनंजय महाडिक यांना ट्रान्स्फर झाली. त्यामुळे २७ अधिक १४ असे ४१ चा काेटा पूर्ण करू शकले. पण जर का महाडिक यांना ३ मते कमी पडली असती तर ते ४० वर अडकले असते आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे शिवसेनेचे संजय पवार विजयी झाले असते.

बातम्या आणखी आहेत...