आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराणा दांपत्याशी ज्या सूड बुद्धीने हे सरकार वागलं, एक ना एक दिवस या नाट्याचा अंत होईल, या शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला. तसेच खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या आव्हानावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांची बॅक डोअर एन्ट्री आहे. त्यांना जनतेने निवडूण दिलेले नाही.
नवनीत राणा आणि रवी राणा हे जनतेतून निवडूण आले आहेत. हनुमान चालिसा पठण करणार हे कारण देत जनतेच्या आशिवार्दाने निवडूण आलेल्या राणांना 14 दिवस कोठडीत टाकण्यात आले. निर्दयीपणे सरकारने ही कृती केली. सूड बुद्धीने एखादा राज्यकर्ता कसा वागू नये हे उदाहरण या सरकारने मांडले आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. याचा अर्थ खरोखर कुणी निवडणूक रिंगणात उतरत नाही. तर आम्ही जनेतून निवडूण आलो आहोत. तुम्ही जनतेतून नाही तर बॅक डोअर एन्ट्री केली आहे. तुम्ही जनतेचे खरे प्रतिनिधी नाही, ही भावना त्यांच्या आव्हानामागे असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली.
अन्यायावर बोलण्याचा अधिकार -
राणा दाम्पत्याला 12 दिवसांनी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना माध्यमांशी बोलायला बंदी घातली होती. मात्र, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी माध्यामांशी संवाद साधला आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कोर्टाने नोटीस बजावली असेल तर त्याचे उत्तर राणा देतील. कोर्टाने एखाद्या विषयावर बोलायचं नाही असं सांगितलं असताना इतर विषयवार बोलण्याचा अधिकार मात्र अबाधित आहे. आपल्या कोणीच मौन साधण्यास सांगू शकत नाही. संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. एखाद्या विषायावर नाही पण, आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार आहे.
काय प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नवनीत राणांची भायखळा कारागृहातून 5 मे रोजी 12 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी 5 ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते. राणा दांपत्याला जामीन देताना त्यांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी अट न्यायालयाने लादली होती. मात्र तरीही राणा दांपत्याने प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे सुरु केल्याने तो अटीचा भंग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.