आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sudhir Mungantiwar Vande Matram Phone Not Hello | Politics Heated Up Against The Ministry Of Culture's Decision; I Will Say 'Jai Maharashtra' Bhujbal's Statement

'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' वरुन वाद:सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात राजकारण तापले; 'जय महाराष्ट्र' म्हणणार -भुजबळ

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

75 वा अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केली होती. मात्र, आता यावरुन राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. सरकारी कार्यालयात फोनवर 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील विरोध केला असून, मी 'जय महाराष्ट्र' म्हणणार असल्याचे सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारचा खातेवाटपाचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. त्यावेळी मुनगंटीवार यांना सांस्कृतिक खाते देण्यात आले. आजपासून इंग्रजानी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्यावर 'हॅलो' म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होत. तेव्हा इंग्रजांनी हा शब्द आणला होता. मात्र, आपल्या स्वातंत्र्यविरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

मी जय महाराष्ट्र म्हणेल

दरम्यान, राज्याचे माजी अन्न पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मी फोनवर वंदे मातरम् म्हणणार नाही. मी फोनवर जय महाराष्ट्र म्हणणार, अशा शब्दांत त्यांनी मुनगंटीवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी हा आदेश काढला, या निर्णयात वाईट असे काहीच नाही. पण काही जण फोनवर 'जय हिंद' काही 'जय महाराष्ट्र' बोलतात. आमचे पोलिस फोन केल्यानंतर 'जय हिंद' असे म्हणतात. शिवसेनेचे लोक 'जय महाराष्ट्र' असे म्हणतात. त्यामुळे मीही 'जय महाराष्ट्र' म्हणणार, असे भुजबळ म्हणाले.

हॅलो हा 18 व्या शतकातील शब्द

दरम्यान, या प्रकरणी पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हॅलो हा शब्द इंग्रजांनी 18 व्या शतकात आणला होता. त्यांना वंदे मातरम् या विरोध आहे त्यांना आपण समजवण्याचा प्रयत्न करू. गेल्या अडीच वर्षात निर्णय न घेणार आता विरोध करून तत्वज्ञान शिकवत आहेत, असे म्हणत त्यांना मविआवर हल्लाबोल केला.

चांगली खाते घेतली नाहीत

पुढे मुनगंटीवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळावर भाष्य केले. ते म्हणाले की, भाजपने चांगली खाती घेतली असे काही नाही. शिवसेनेचे खाते शिवसेनेलाच देण्यात आले असून, काँग्रेस, राष्ट्रवादीचे खाते भाजपने घेतल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...