आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
2019 साली महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. गडबड होऊ नये यासाठी दक्षता घेत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन या दोघांनी शपथ घेतली. परंतु हे सरकार अल्पायुषी ठरले. गेल्या काही दिवसात पहाटेच्या शपथविधीबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता एक मोठे विधान केले आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार म्हणाले, भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला.
पवारांनीही उद्या पाठिंबा दिला तर...
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणात काही वेळा परिस्थितीनुसार तात्कालिक स्वरूपात आपद्धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. अजित पवार भाजपमध्ये येणार, याबाबत मी प्रसिद्धीमाध्यमातूनच बातम्या पाहात आहे. शरद पवारांनीही उद्या पाठिंबा दिला, तर तो घेणार नाही, असे आम्हाला कसे म्हणता येईल? असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला.
अजित पवारांपुढे अट नव्हती
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला होता. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते.
हेही वाचा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.