आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकार भांडवलदारांचे:राष्ट्रवादी काँग्रेसची तिखट टीका; रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरून हल्लाबोल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकार हे भांडवलदारांचे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

तपासे म्हणाले की, मोदी सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

२०१४ मध्ये मोदी सरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला, असा थेट हल्ला बोलही महेश तपासे यांनी केला.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे काल प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे असेही महेश तपासे म्हणाले.

मोदी सरकार भांडवलदारांचे आहे, हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो. परंतु या सर्वेनुसार रोजंदारी करणार्‍या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदीसरकारने काहीच केले नाही, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

नोटबंदी करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच. शिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार आणि नोकर्‍यांना मुकावे लागले होते. मात्र, त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्ज माफ करून मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...